
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची मराठवाडा व विदर्भाकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांची वाहतूक शुक्रवार सकाळपासून पुन्हा सुरळीत झाली.
पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची मराठवाडा व विदर्भाकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांची वाहतूक शुक्रवार सकाळपासून पुन्हा सुरळीत झाली. शिवाजीनगर वाकडेवाडी एसटी आगारातून सकाळपासून ५५० एसटी गाड्या विविध मार्गांवर मार्गस्थ झाल्याने सामान्य प्रवासांना दिलासा मिळाला आहे.
सहा दिवसांपासून एसटी सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. अखेर एसटी सेवा पूर्ववत झाल्याने सायंकाळनंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या जवळपास ५५० मार्गांवरील बस सोडण्यात आल्या असल्याचे शिवाजीनगरचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.