Restore Night Passenger on Purna Akola Railway Line - Dr. Minister's statement to Raosaheb Danve

ग्रामीण प्रवासासाठी रात्रीच्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी डॉ. स्वप्नील मंत्री ( Dr. Swapneel Mantri) यांनी केंद्रीय रेल्वे तथा कोळसा राज्यमंत्री (Union Minister of State Railways and Coal) रावसाहेब दानवे पाटील (Raosaheb Danve Patil ) यांच्याकडे २४ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली.

    जऊळका रेल्वे : दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) विविध मागण्या व समस्या तात्काळ सोडवून वाशीम जिल्ह्यातील (Washim District) जऊळका रेल्वे (jaulaka  Railway) येथे एक्सप्रेस (Express ) थांबा देण्यात यावा, यासह एक्सप्रेस ऐवजी ग्रामीण प्रवासासाठी रात्रीच्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी डॉ. स्वप्नील मंत्री ( Dr. Swapneel Mantri) यांनी केंद्रीय रेल्वे तथा कोळसा राज्यमंत्री (Union Minister of State Railways and Coal) रावसाहेब दानवे पाटील (Raosaheb Danve Patil ) यांच्याकडे २४ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली.

    दक्षिण – मध्य रेल्वेच्या विविध मागण्या व समस्या तात्काळ सोडविण्याबाबत दिलेल्या निवेदनात भाजपा वैद्यकीय सेलचे प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील मंत्री यांनी नमूद केले आहे. अमरावती – औरंगाबाद, नागपूर – औरंगाबाद, औरंगाबाद – जोधपूर, नांदेड- बीकानेर इ. रेल्वे सुरू कराव्या,सर्व एक्स्प्रेस गाड्या जउळका रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा व पूर्णा अकोला रेल्वे लाईन वर रात्रीला ग्रामीण प्रवासासाठी पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.

    तसेच, मुदखेड – मनमाड, पूर्णा – अकोला रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, तात्काळ टिकीट बुकींगसाठी टोकन सिस्टीम सुरू करण्यात यावी. रेल्वे स्थानकावर डिजीटल चलनाला प्रोत्साहन देऊन रेल्वे पेपरलेस करण्यासाठी सर्व प्रकारची टिकीटे एसएमएस द्वारी यात्रेकरूंना देण्यात यावे. अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे डॉ. मंत्री यांनी केली.