पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी पोलिसांकडून निर्बंध लागू

कोरोना संकट ओसरल्यानंतर यंदाच्या वर्षी कोरोना निर्बंध संपूर्ण शिथिल झाल्यानंतर देश व राज्यातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांकडून (Alandi Police ) निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    पिंपरी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी पोलिसांकडून काही निर्बंध (Restrictions ) लागू करण्यात आले असून हे निर्बंध २२ जून पर्यंत लागू राहणार आहेत. (Palkhi Departure Ceremony)  कोरोना संकट ओसरल्यानंतर यंदाच्या वर्षी कोरोना निर्बंध संपूर्ण शिथिल झाल्यानंतर देश व राज्यातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांकडून (Alandi Police ) निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    पालखी प्रस्थान सोहळ्यात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आळंदी शहरातील मंदिर परिसर व आजूबाजूचा परिसर “हाॅकर्स फ्री” झोन करण्यात येणार आहे. यामुळे फेरीवाले, प्रसाद दुकानदार, पथारीवाले, हातगाडीवाले यांना रस्त्यावर सामान विक्री करण्यास मनाई असणार आहे. दरम्यान, आळंदीमध्ये जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, आळंदीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहतूकसाठी रहदारीचे पोलिसांनी नियमन करण्यात आलेले आहे. आळंदी नगरीत प्रवेश करण्यासाठी नागरिकांना बाह्यवळण अथवा पर्यायी रस्त्याचा वापर करता येणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांनी कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी मास्क लावून नियमांचे पालन करावे, तसेच अनावश्यक गर्दी करू नये असे सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना काही अडचण आल्यास आळंदी नगरपालिका किंवा आळंदी पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.