चार राज्यांचे निकाल म्हणजे लोकसभेचा निकाल नाही : शरद पवार

चार राज्यात तयारी करूनच भाजपने दोन ठिकाणी आघाडी घेतली, असे निकाल अपेक्षितच होते इंडिया आघाडीच्या बैठकीत या विषयांवर चर्चा होईल या निकालावर सायंकाळी सहा नंतरच बोलता येईल मात्र चार राज्यांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादनं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केले .

  सातारा : चार राज्यात तयारी करूनच भाजपने दोन ठिकाणी आघाडी घेतली, असे निकाल अपेक्षितच होते इंडिया आघाडीच्या बैठकीत या विषयांवर चर्चा होईल या निकालावर सायंकाळी सहा नंतरच बोलता येईल मात्र चार राज्यांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादनं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केले .

  रविवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या थोरल्या पवारांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी चार राज्याच्या निवडणुकांवर भाष्य केले असून याच्या पेक्षा वेगळा निकाल लागेल असे अपेक्षित नसल्याचे म्हटले आहे यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते .

  ते पुढे म्हणाले,आमच्याकडे याच्यापेक्षा वेगळी माहिती नव्हती. तसेच दोन ठिकाणी भाजपाचे राज्य होत, तेथे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले होते. राज्यस्थान मध्ये कांग्रेस सत्तेत होती, पुन्हा नवीन लोकांना संधी दिली. एकूणच राज्यस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणूक निकालावर पवार म्हणाले चार राज्यात आलेले निकाल यापेक्षा वेगळे असू शकत नव्हते .उद्या 4 राज्यातल्या निकालानंतर मंगळवारी इंडीया अलायंन्सची बैठक खर्गे यांच्या घरी बोलावली आहे. त्यात चर्चा होईल यात निकाल लागलेल्या राज्यातील जाणकारांच मत सुद्धा घेणार आहोत. तेलंगाणात एक ट्रेन्ड होता, ज्याच्या हातात सत्ता त्यांचीच सत्ता राहील. परंतु, राहूल गांधी यांची हैद्राबादला एक सभा झाली, तेथे जमलेल्या गर्दीवरून काॅंग्रेसची सत्ता येईल, असे वाटत होते. तसेच झाले.

  अजित दादांना द्यायला कमी पडलो…
  आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष आहोत. त्यामुळं अजित पवार कोणाला काय म्हणाले, या बाबत त्यांना विचारा. तसेच मी त्यांना काय- काय द्यायला कमी पडलो ते तुम्ही त्यानांच विचारा असेही शरद पवार म्हणाले.

  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
  आम्हा सगळ्यांची मागणी संपुर्ण देशात जात निहाय जनगनना झाली पाहिजे, त्यानंतर संपुर्ण चित्र स्पष्ठ होईल.त्यानंतर ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांची स्पष्टता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. यात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु, त्यासोबत इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भुमिका घेतली आहे.