सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब जाधव यांचे निधन

कापील, (ता. कराड) येथील सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब भाऊसो जाधव (वय ८५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते नाना मास्तर म्हणून ते परिचित होते.

    उंब्रज : कापील, (ता. कराड) येथील सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब भाऊसो जाधव (वय ८५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते नाना मास्तर म्हणून ते परिचित होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय जाधव आणि पत्रकार अजय जाधव यांचे ते वडील होत.

    जुन्या पिढीतील प्राथमिक शिक्षक होते. फलटण तालुक्यात त्यांनी शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर मेढा आणि कराड तालुक्यातील चरेगाव, उंब्रज येथे सेवा बजावली. तालुका मास्तर पदावरून ते निवृत्त झाले होते. नोकरीच्या निमित्ताने ते उंब्रज (ता. कराड) येथे स्थायिक झाले होते.

    मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. उंब्रजमधील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर कापील या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी गुरूवारी दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता कापील येथे होणार आहे.