Due to heavy rains in Sahoor area, flood crisis again on farmers, how to live now? The question of farmers

खानापूर तालुक्याला दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील तलावातील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. येरळा नदी खरीप हंगामात पिकांना जीवदान मिळाले आहे.

  विटा : खानापूर तालुक्याला दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील तलावातील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. येरळा नदी खरीप हंगामात पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील येरळानदी दुथडी भरून वाहत आहे. येरळानदी वरील रामापूर-कमळापूर पूल व भाळवणी-नेवरी ओढ्यावरील पूलावर पाणी आले आहे. आळसंद तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. रामापूर -कमळापूर गावांचा संपर्क तुटला आहे.

  बळिराजा स्मृती धरणावरुन पाणी ओसांडून वाहत आहे. तालुक्यात सरासरी ४२.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील भांबर्डे, लेंगरे, वाळूज, वेजेगाव तलावात कमी पाणी साठा आहे. उर्वरित तलावात मुबलक पाणी साठा आहे. आळसंद तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण आहे.

  दाेन िदवसांत ४२.६८ मिमी
  दोन दिवसांपासून तालुक्यात सरासरी ४२.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने तालुक्यात दणका दिला आहे. नागेवाडी, माहुली, गार्डी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. परिसरातील विहिरी, सिमेंट बंधारे, तलाव पाण्याने भरून वाहू लागले आहे.

  घाटमाथ्यावर संततधार
  तालुक्याच्या घाटमाथ्यावरील खानापूर, करंजे, बाणूरगड, पळशी यासह घाटमाथ्यावर संततधार सुरू आहे.खरीप हंगामातील ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये यासह विविध पिकांना जीवदान मिळाले आहे.

  तालुक्यातील तलावातील सरासरी पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

  तलावाचे नाव    पाणी पातळी    पाणीसाठा
  भांबर्डे    :         १०१.०५          १२.८१
  लेंगरे   :               ९६.६५         १३.२६
  वाळूज :             ९५.७५     ‌    ५९.६७
  वेजेगाव :         ‌‍‌‌   ९५. १५      ‌‌  २८. ६६
  भाकुचीवाडी : ‌  ६८०.३०         २६१. २९
  ढवळेश्वर :        ५९. ७५             ९३.१३
  आळसंद :         ४८. ५७      ‌      सांडव्यातून पाणी बाहेर
  पारे :                 ४६. ४५.          ३७.६७
  सुलतानगादे :       ९१.३०.          ४०.११
  वाझर :             ५८७ . ११           १३.१७.

  मंडलनिहाय पडलेला पाऊस : ( मिलिमीटर )
  खानापूर : ४२.८
  करंजे : ६०.३
  लेंगरे : ४१.३
  विटा :  ४३.५
  भाळवणी : २५.५

  सरासरी पडलेला पाऊस : ४२.६८ मिलिमीटरमध्ये : (१२सप्टेंबर २०२२)