राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर; बहुचर्चित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे…

या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

  मुंबई: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. (revised list of guardian ministers of eleven districts of the state announced)

  सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

  पुणे- अजित पवार

  अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

  सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

  अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

  भंडारा- विजयकुमार गावित

  बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

  कोल्हापूर- हसन मुश्रीफ

  गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

  बीड- धनंजय मुंडे

  परभणी- संजय बनसोडे

  नंदूरबार- अनिल भा. पाटील

  वर्धा – सुधीर मुनगंटीवार