पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका माहिती अधिकार कार्यकर्त्याला; माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अर्जदाराचा आरोप

पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका माहिती अधिकार कार्यकर्त्याला बसला आहे. पहिल्या सुनावणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याला देण्यात आलेली तारीख उलटून गेल्यानंतर उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आल्याने 'तोंड झोडू की नाशिक सोडू' असे म्हणण्याची वेळ या माहिती कार्यकर्त्यावर आली आहे.

    पंचवटी : पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका माहिती अधिकार कार्यकर्त्याला बसला आहे. पहिल्या सुनावणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याला देण्यात आलेली तारीख उलटून गेल्यानंतर उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आल्याने ‘तोंड झोडू की नाशिक सोडू’ असे म्हणण्याची वेळ या माहिती कार्यकर्त्यावर आली आहे. त्यामुळे माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहिती अधिकारी चंद्रकांत लासुरे यांनी केला आहे.

    याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत नारायण लासुरे (रा. युनियन पार्क, सहकारनगर, नाशिक) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील भद्रकाली पोलीस ठाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याबाबत माहिती मागवली होती. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडे मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची दिशाभूल करणारी आणि वेळकाढूपणा करत दिली जात असल्याने लासुरे यांनी याबाबत तीन वेगवेगळी प्रथम अपील दाखल केली होती.

    या अपीलाबाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त, मुख्यालय चंद्रकांत खांडवी यांच्या स्वाक्षरी सुनावणीसाठी ३ नोव्हेंबर रोजीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी एक पत्र तयार करून त्यामध्ये सुनावणीची तारीख टाकून ते पत्र २६ ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. मात्र, हे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत लासूर यांना सुनावणीची तारीख उलटून गेल्यानंतर शनिवारी (दि.११) रोजी मिळाल्याने त्यांनी हा सर्व प्रकार माहिती दडविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे.