
दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून, या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर शेगावमध्ये चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अहमदनगर : राम नवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात राडा झाला होता. यावेळी मोठ्या हिंसाचार झाला होता. यानंतर शनिवारी रात्री अकोल्यात दोन गटात राडा झाल्याची ताजी असताना, काल रविवारी अहमदनगरमधी शेवगामध्येही (Shevgaon Riot) जोरदार राडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणुक काढण्यात आली होती. या निवडणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. कारण या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याचे समजते. या दगडफेकीत संबंधीत परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कालपासून येथे जमावबंदी करण्यात आली होती, तसेच इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती.
आज काय होणार…
या राड्यात 102 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 4 पोलीस जखमी झाले आहेत, त्यामुळं कालपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, इंटरनेट सेवा आजपासून सुरु करण्यात येणार आहे. कारण आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
अनेक जणांवर गुन्हे दाखल, 4 पोलीस जखमी
दरम्यान, दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून, या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर शेगावमध्ये चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कालपासून जमावबंदी करण्यात आली असून, कालपासून इंटरनेट सेवा देखील ठप्प झाली आहे. त्यामुळं आदजपासून पूर्ववत परिस्थिती होईल असं बोललं जातंय.
नेमकं काय घडलं?
शेगावमध्ये काल मिरवणूक सुरू होती. त्यावेळी अचानक दगडफेक झाली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. मिरवणुकीतील लोकांनीही संतप्त होऊन दगडफेकीस सुरुवात केली. यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. इतकेच नव्हे तर दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली. जमाव प्रचंड संतप्त झाला होता. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या शेवगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं.
दोषींवर कठोर कारवाई
ही घटना पूर्वनियोजित होती. या राड्यात वाहनांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी दंगलीत मृत झालेल्या व्यकतीच्या कुटुंबाला भेट देऊन त्याचे सांत्वन केले. तसेच मृतकाच्या कुटुंबाला चार लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी जाहीर केल आहे.