Rosod's Shubham Banore left for Germany for a study tour of Sorti Project

या अभ्यास दौर्‍यादरम्यान शुभम बानोरे याला जर्मनीतील विविध विद्यापीठामधील प्रयोगशाळा येथे ड्रोनचा वापरावर होत असलेले संशोधन व तेथील संशोधकांना भेटण्याची संधी लाभणार आहे. भारत सरकारच्या अशा उपक्रमामुळे देशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्याना परदेशात होणार्‍या संशोधनांचा अभ्यास करण्याची व तेथे काम करण्याची संधी मिळते.

    रिसोड : नैसर्गिक आपत्ती किंवा संरक्षणात्मक अस्थिरतेमुळे कोसळलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे लवकरात लवकर वाचवता यावे, यासाठी भारत सरकार (Government of India) व जर्मन सरकार (German Govt) यांच्या संयुक्त विद्यमाने बचाव पथक (Rescue team) यांच्या मदतीसाठी नवीन तंत्रज्ञान (New technology) विकसित करण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून या प्रकल्पाला सॉर्टी (Sortie project ) असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी (Study tour) रिसोड येथील शुभम बानोरे (Shubham Banore) यांची निवड झाली आहे.

    सदर प्रकल्पासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे स्पार्क प्रकल्पाच्या अंतर्गत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे नवीन तंत्रज्ञान मुख्यतः ड्रोनचा उपयोग घेऊन विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भारत व जर्मनीमधील संशोधन अभ्यासक सहयोगाने काम करत असून भारत सरकारतर्फे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (Indian Institute of Technology) (आय.आय.टी.) (I.I.T) दिल्ली (Delhi) तर, जर्मन सरकारतर्फे (German Govt) जर्मनीमधील विविध विद्यापीठे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन कार्य करत आहेत.

    आय.आय.टी. दिल्लीतर्फे प्राध्यापक डॉ. वसंत मतसागर (Dr. Vasant Matsagar) व त्यांचे विद्यार्थी या प्रकल्पावर काम करत आहेत. रिसोडचा मुळ रहिवासी असलेला शुभम गजानन बानोरे दिल्लीमधील भारतीय प्रौद्योगिक संस्थान येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असून प्राध्यापक डॉ. वसंत मतसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सॉर्टी प्रकल्पावर काम करत आहे. याच प्रकल्पाच्या कामासाठी शुभम बानोरे यांना जर्मनीमधील म्युनिक शहरातील बुंदेसवेहर विद्यापीठ येथे प्राध्यापक डॉ. नोर्बर्ट गेबेकेन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करण्याची संधी मिळाली आहे.

    या अभ्यास दौर्‍यादरम्यान शुभम बानोरे यांना जर्मनीतील विविध विद्यापीठामधील प्रयोगशाळा येथे ड्रोनचा वापरावर होत असलेले संशोधन व तेथील संशोधकांना भेटण्याची संधी लाभणार आहे. भारत सरकारच्या अशा उपक्रमामुळे देशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्याना परदेशात होणार्‍या संशोधनांचा अभ्यास करण्याची व तेथे काम करण्याची संधी मिळते. तसेच तेथील प्राध्यापक व संशोधक यांचे मार्गदर्शन लाभते. यामुळे, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व संशोधक वृत्तीला चालना मिळते.

    रिसोड सारख्या ग्रामीण भागात राहणार्‍या शुभम गजानन बानोरे या विद्यार्थ्याला सॉर्टी प्रकल्पाच्या संशोधन कार्यासाठी जर्मनी येथे काम करण्याची संधी भारत सरकार व आय. आय. टी. दिल्लीतर्फे मिळाल्यामुळे शुभमचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.