राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईतील सदानंद दाते, विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे

तब्बल दोन वर्ष पुण्यात कार्यकाळ पुर्ण करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का मॅन म्हणून ओळख झाली होती. सर्वाधिक मोक्का कारवाया करणारे राज्यातील ते पहिले अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात ११४ टोळ्यांवर मोक्का कारवाईकरून ९०० हून अधिक गुन्हेगारांना कारागृहात पाठविले आहे. तर एमपीडीएनुसार ८९ गुन्हेगारांवर स्थानबद्धेतेची कारवाई केली आहे.

    पुणे : राज्यातील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी सायंकाळी गृहविभागाने काढले. राज्यातील तब्बल तीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पुण्याच्या पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनपेक्षित झालेल्या बदल्यांनी पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    तब्बल दोन वर्ष पुण्यात कार्यकाळ पुर्ण करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का मॅन म्हणून ओळख झाली होती. सर्वाधिक मोक्का कारवाया करणारे राज्यातील ते पहिले अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात ११४ टोळ्यांवर मोक्का कारवाईकरून ९०० हून अधिक गुन्हेगारांना कारागृहात पाठविले आहे. तर एमपीडीएनुसार ८९ गुन्हेगारांवर स्थानबद्धेतेची कारवाई केली आहे. या दोन्ही कारवाया पुणे पोलीस दल व राज्य पोलीस दलात सर्वाधिक करणारे ते एकमेव अधिकारी ठरले आहेत. त्यासोबतच बालस्नेही पोलीस ठाणे तसेच वेगवेगळ्या उपाययोजना आणि पोलीस दलातील बदल्यांमध्ये वेगळा पॅटर्न वापरून त्यांनी पारदर्शकता आणली होती.

    पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्याजागी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनयकुमार चौबे यापुर्वी अप्पर पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख होते.

    दोन वर्षात गाजलेली प्रकरणे…

    पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या काळात अनेक प्रकरणे गाजले गेली. त्यात आयुक्तांनी पदभार स्विकारताच पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच एका बड्या बिल्डरचा जमीनीच्या वादातून गोळ्या झाडून खून झाला आणि याच गोळीबारानंतर त्यातील आरोपींना मोक्कात न अटक करण्यासाठी ७५ लाख रुपये घेतल्याची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यासोबतच बिर्याणी प्रकरणानंतर अनेकदिवस पोलीस दलातील वातावरण “ताईट” झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे यामुळे खालची फळी कईक दिवस शांततेत होती. तर, बिर्याणीमुळे महिला अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयच वर्ज केले होते.

    राज्यातील एकूम ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात बंदल्यांची चर्चा होती. त्याला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या देखील लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

    पदोन्नतीने बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे (Maharashtra IPS Transfer)-

    १. सदानंत दाते (पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अप्पर महासंचालक, एटीएस, मुंबई)

    २. विश्वास नांगरे-पाटील (सह आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

    ३. मिलिंद भारंबे (आयजी, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, महाराष्ट राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई)

    ४. राज वर्धन (सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, नि-सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई)

    ५. विनय कुमार चौबे (अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)

    ६.अमिताभ गुप्ता (पोलिस आयुक्त, पुणे शहर ते अप्पर महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट राज्य, मुंबई)

    ७. निकेत कौशिक (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

    ८. शिरीष जैन (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

    ९. संजय मोहिते (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात)

    १०. नवीनचंद्र रेड्डी (अप्पर आयुक्त, नागपूर शहर ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर)

    ११. आरती सिंह (पोलिस आयुक्त, अमरावती शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस, बृहन्मुंबई)

    १२. नामदेव चव्हाण (अप्पर आयुक्त, पुणे शहर ते उप महानिरीक्षक, सीआयडी, पुणे)

    १३. निसार तांबोळी (उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड ते अप्पर आयुक्त, वाहतूक, बृहमुंबई)

    १४. ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्प्र आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

    १५. रंजन कुमार शर्मा (उप महानिरीक्षक, सीआयडी ते अप्पर आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई)

    * विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार आणि महेश पाटील यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

    बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आणि पुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे –

    १. रितेश कुमार (अप्पर महासंचालक, सीआयडी ते पोलिस आयुक्त, पुणे शहर)

    २. मधुकर पांडे (अप्प्र महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार)

    ३. प्रशांत बुरडे (अप्पर महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मुंबई ते अप्पर महासंचालक, सीआयडी, महाराष्ट्र राज्य, पुणे)

    ४. सत्यनारायण चौधरी (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई)

    ५. निशित मिश्रा (आयजी, एटीएस, मुंबई ते पोलिस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई)

    ६. प्रवीण पडवळ (सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई ते सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)

    ७. लखमी गौतम (आयजी-आस्थापना ते पोलिस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

    ८. एस. जयकुमार (आयजी, प्रशासन ते पोलिस सह आयुक्त, प्रशासन, बृहन्मुंबई)

    ९. अंकुश शिंदे (पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते पोलिस आयुक्त, नाशिक शहर)

    १०. प्रवीण पवार (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते आयजी, कोकण परिक्षेत्र, कोकण)

    ११. सुनिल फुलारी (आयजी, मोटर परिवहन, पुणे ते आयजी, नाशिक परिक्षेत्र, नाशिक)

    १२. अनिल कुंभारे (अप्पर आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, मध्ये प्रादेशिक, बृहन्मुंबई)

    १३. परमजीत दहिया (उप महानिरीक्षक, एटीएस ते अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

    १४. विनायक देशमुख (अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

    १५. राजीव जैन (अप्पर आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई)

    * सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी.जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.