trimbakeshwar temple

र्यंबकेश्वर दरवर्षी ऊरुस साजरा करण्यात येतो. त्यावेळी शंकराला चादर दाखवण्याची आणि बाहेरुन धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं या ऊरुसाचे आयोजक मुतिन सय्यद यांचं म्हणणं आहे. त्यासाठी मंदिरात प्रवेश केला जात नाही. बाहेरुनच चादर आणि धूप दाखवण्यात येतो.

    त्र्यंबकेश्वर: नाशिक (Nashik) जिल्हात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमधील (Trrimbakeshwar Temple) शंकराचं मंदिर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शनिवारी संध्याकाळी काही मुस्लिमांनी ऊरुसाच्या वेळी चादर घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण तापलं होतं. आक्रमक झालेल्या हिंदू संघटनांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. तसंच या प्रकरणात एफआयआर दाखल करुन कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंर ऊरुस आयोजन समितीतील 4 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान बुधवारी हिंदू महासंघ आणि इतर हिंदू संघटनांनी मंदिर परिसरात शुद्धीकरण केलं. (Trimbakeshwar Temple Dispute)

    मंदिर प्रशासनाचं काय म्हणणं ?
    मुस्लीम तरुणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा केलेला प्रयत्न हा सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. त्यावेळी बराच वादही झाल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीही असाच प्रकार करण्यात आला होता, असं सांगण्यात येतंय. त्यावेळीय इतर धर्मियांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. मंदिरात शिवलिंगावर चादर टाकण्याचा हा प्रयत्न होता, असंही सांगण्यात येतयं.

    मुस्लीम समाजाचा काय दावा?
    तर मुस्लीम समाजानं हा शिवलंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न नव्हता, असं स्पष्ट केलेलं आहे. गेल्या काही दशकांपासून मंदिराला चादर दाखवण्याची प्रथा पाळण्यात येत होती, असं त्यांनी सांगितलंय. ही अशी परंपरा होती का? यावरुन आता वादंग सुरु झाला आहे.

    मंदिराला चादर आणि धूप दाखवण्याच्या प्रथेवरुन वाद
    त्र्यंबकेश्वर दरवर्षी ऊरुस साजरा करण्यात येतो. त्यावेळी शंकराला चादर दाखवण्याची आणि बाहेरुन धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं या ऊरुसाचे आयोजक मुतिन सय्यद यांचं म्हणणं आहे. त्यासाठी मंदिरात प्रवेश केला जात नाही. बाहेरुनच चादर आणि धूप दाखवण्यात येतो. ज्या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत ते मंदिरात पिंडीवर चादर टाकण्यासाठी जात नसल्याचा दावाही करण्यात आलाय. तर पिढ्यानपिढ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ धूप दाखवण्यात येतो, असं माजी नगराध्यक्ष अवेज कोकणी यांनीही सांगितलंय. आता या परंपरेचा विरोध का करण्यात येतोय, असा प्रश्नही विचारला जातोय. यावर मंदिराच्या विश्वस्तांनी अशा कोणत्याही प्रथेची नोंद रेकॉर्डवर नाही, असं सांगितलेलं आहे.

    कधी झाला होता त्र्यंबकेश्वर मंदिरावर हल्ला?
    मुघल साम्राज्यात औरंगजेबानं 1690 मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि शिवलिंगावर हल्ला केला होता. मंदिराची तोडफोड करत मशिदीचे गुबंद मंदिरावर लावण्यात आले होते. त्यावेळी नाशिकच नावही बदलण्यात आलं होतं. त्यानंतर 1751 साली मराठ्यांनी पुन्हा एकदा नाशिकवर कब्जा मिळवला. त्यानंतर मंदिर नव्यानं बांधण्यात आलं. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार कधी ?
    औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केला. सोन्यानं आणि किमती रत्न असलेलला शिवलिंगाचा मुकुट पांडवांनी स्थापित केल्याची पौराणिक कथा सांगण्यात येते. तसंच सतराव्या शतकातही मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं सांगण्यात येतं.