नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान यायचं…अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

मग आपण आपल्याच भाषेत लग्नपत्रिका लिहूयात, असा विचार माझ्या मनात आला. मग मी स्वत:च लग्नपत्रिकेचा सर्व मजकूर लिहला. असं आर.जे. सुमित म्हणाला.

    कोल्हापूर : आता लग्नाचा सिझन सुरू झालाय. लग्न म्हणटलं काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देतो. एकतर लग्नातील जेवणाची व्यवस्था आणि दुसरी म्हणजे लग्नपत्रिका. आपल्या लग्नाची पत्रिका खास असावी यासाठी आपण कित्येक वेळ ती लग्नपत्रिकेची डि़जाईन बघण्यात घालवतो. अशीच काहीसा विचार कोल्हापुरच्या एका तरुणाच्या डोक्यातही आला आणि त्याने नेहमीच्या पत्रिकेपेक्षा हटके अशी पत्रिका तयार करुन घेतली आहे. खास कोल्हापुरी भाषेत असलेली ही पत्रिका सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

    आर जे सुमीत हे (Rj sumit marriage invitation)या तरुणाचं नाव आहे ज्याच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. कारण या लग्नपत्रिकेवरील मजकूर कोल्हापूरच्या खास रांगड्या बोलीभाषेत लिहण्यात आला आहे. ‘शनवारी सांच्याला हळद, रव्वारी १ वाजून ३ मिंटाचा मुहूर्त! अशा अस्सल कोल्हापुरी भाषेत त्याने लग्नाचं निमत्रंण दिलंय.

    या बाबत आर.जे. सुमितला विचारलं असता तो म्हणाला की, सोशल मीडियावर लोक मला कोल्हापूरचा आर.जे. सुमित म्हणून ओळखतात. मग आपण आपल्याच भाषेत लग्नपत्रिका लिहूयात, असा विचार माझ्या मनात आला. मग मी स्वत:च लग्नपत्रिकेचा सर्व मजकूर लिहला. त्यांनतर ही हटके लग्नपत्रिका तयार झाली.