स्वातंत्र्यानंतर कळकराईत गावात पहिल्यांदाच होतोय रस्ता;आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश

मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई ते कर्जत तालुक्यातील मोग्रज या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार (२४) करण्यात आला.

    वडगाव मावळ:  मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई ते कर्जत तालुक्यातील मोग्रज या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार (२४) करण्यात आला.

    मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे दिड कोटी निधीतुन मावळ, खेड व कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या कळकराई या दुर्गम भागातील गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्ता होत आहे

    विकासकामांपासुन वंचित असलेल्या या भागात रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम होणार असून सुमारे दीड किलोमीटर पेक्षा अधिकच्या रस्त्याचे काम या निधीतून होणार आहे.कामास तात्काळ सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.

    तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेसहा कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात होईल.त्यामुळे या भागाचा विकासाचा अनुशेष भरून निघणार असून पक्क्या रस्त्यांमुळे या भागातील दळणवळणास गती मिळणार आहे.

    या कार्यक्रम प्रसंगी सावळा ग्रामपंचायतचे सरपंच नागू ढोंगे,सदस्य सचिन तळपे,चंद्रकांत कावळे, सूर्यकांत तळपे,सखाराम कावळे, भरत साबळे,लक्ष्मण कावळे, नारायण मालपोटे, मयूर नाटक, योगेश गायकवाड, सखाराम लाडके, बुधाजी कावळे,अशोक लाडके,पांडुरंग घुटे, लाला लाडके तसेच मोग्रज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.