पुण्यात वाहतूक पोलीसांकडून रस्ते सकाळपासूनच बंद, नागरिकांना मनस्ताप

शहरात दोन्ही पालख्या येणार असल्यामुळे पोलिसांनी गोपाळ कृष्ण गोळले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता या मार्गावरील अंतर्गत रस्ते बांवू लावून सकाळी साडेदहाच्या सुमारास बंद करण्यास सुरवात केली. पालखी मार्ग व परिसरातील बहुतेक अंतर्गत रस्ते दुपारी बारापर्यंत बांबू लावून बंद केले होते. तसेच, पेठांमधील अनेक अंतर्गत रस्ते बंद केले होते. तर, नळस्टॉपवरून डेक्कनकडे येणारा रस्ता देखील नळस्टॉपवर बंद केला होता. तर, अंतर्गत रस्ते बंद केल्याने परिसरात कार्यालये तसेच येथून बाहेर जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाली.

    पुणे – शहरात बुधवारी पालख्यांचे आगमन होत असल्याने पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परंतु, वाहतूक विभागाने पालखी मर्ग आणि त्याबरोबरच या मार्गाला जोडणारे अंतर्गत रस्तेही बांबू लावून सकाळपासूनच बंद केल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. (Roadblocks Across City ) पुणेकरांना वाहतूक कोंडीचा (Traffice Jams)  मनस्ताप तर सहन करावा लागलाच, परंतु, दोन्ही पालख्यांचे आगमन सायंकाळी होणार असताना रस्ते सकाळपासून का बंद केले, अशा प्रश्न विचारला जात होता.

    संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी आगमन होत आहे. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीचे नियोजन करण्यात आले होते. वाहतूकीला अडथळा होऊ नये तसेच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, असे नियोजन केले आहे. तसेच, लाईव्ह अपडेटही देण्यात येत असल्याचे स्वतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, वाहतूक पोलीसांच्या नियोजनामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांब‌ळ उडाल्याचे दिसून आले आहे.

    शहरात दोन्ही पालख्या येणार असल्यामुळे पोलिसांनी गोपाळ कृष्ण गोळले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता या मार्गावरील अंतर्गत रस्ते बांवू लावून सकाळी साडेदहाच्या सुमारास बंद करण्यास सुरवात केली. पालखी मार्ग व परिसरातील बहुतेक अंतर्गत रस्ते दुपारी बारापर्यंत बांबू लावून बंद केले होते. तसेच, पेठांमधील अनेक अंतर्गत रस्ते बंद केले होते. तर, नळस्टॉपवरून डेक्कनकडे येणारा रस्ता देखील नळस्टॉपवर बंद केला होता. तर, अंतर्गत रस्ते बंद केल्याने परिसरात कार्यालये तसेच येथून बाहेर जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाली. त्यांना इच्छितस्थळी कसे जावे हेच समजत नव्हते. परिणामी, वाहन चालकांनी मिळेल तेथून रस्ता काढत वाहने दामटली अन वाहन चालकांचा उलटा प्रवास पाहिला मिळाला. यादरम्यान, बंदोबस्तावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार घडले. नागरिकांनी पालखी सायंकाळी येणार असताना एवढ्या लवकर रस्ते का बंद केले, अशी विचारणा केली. त्यावर या बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी वरिष्ठांचे आदेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    दोन वर्षांच्या कालखंडानंतर पालखी सोहळा होत असल्याने अतिशय उत्साही वातावरण आहे. रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता पोलीसांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीसांनी योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पण, दुसरीकडे वाहतूक बंदोबस्ताबरोबरच वाहतुकीचे नियोजन सकाळापासून चुकल्याने त्याचा परिणाम वाहन चालकांना सहन करावा लागला. दरम्यान, या पालखी सोहळ्याचा बंदोबस्त केलेला एकही अनुभवी अधिकारी नसल्याने पुणे पोलीसांना अडचणींचा सामना करावा लागला.

    पूर्वी पालख्या सोहळ्यादरम्यान चारपर्यंत वाहतूक सुरू राहत होती. तसेच, पालखी मार्ग सोडून इतर ठिकाणचे मार्ग बांबू लावून बंद केले जात नसत. यंदा सकाळापासूनच अंतर्गत रस्ते बंद केले गेले. जंगली महाराज रस्त्यावरील अंतर्गत रस्ते कधीही बंद केले जात नसत. पण, झाशीची राणी चौक, जुना बाजार चौक, तसेच, पेठातील अनेक अंतर्गत रस्ते बंद केले गेले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक, कार्यालयात येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. शहराच्या अनेक भागात कोंडी झाल्याचे चित्र पाहिला मिळाले.