हातकणंगले तालुक्यातील आळते येथे घरफोडी

आळते इथल्या भरचौकातील दोन बंद घराची कुलपे तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दोनपैकी एकाच घरातील रोख २५ हजारासह सोन्या चांदीचे दागिने अशी ७५ हजारावर डल्ला मारला.

    हातकणंगले : आळते इथल्या भरचौकातील दोन बंद घराची कुलपे तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दोनपैकी एकाच घरातील रोख २५ हजारासह सोन्या चांदीचे दागिने अशी ७५ हजारावर डल्ला मारला. पण एका घरातुन चोरट्यांना हात हलवत परतावं लागलं. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे.

    हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या भरचौकाशेजारी शिला नेमिनाथ संकाण्णा यांचा घर आहे.

    शिला संकाण्णा दोन दिवसापुर्वी शिरठोण इथ नातेवाईकांच्या वास्तुशांती साठी घराला कुलुप लावुन गेल्या होत्या. आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलुप उचकटुन घरात प्रवेश केला. तिजोरी, कपाट उचकटुन त्यातील रोख २५ हजारासह सोन्या आणि चांदीची दागिने ५० हजाराची अशी ७५ हजाराची चोरी केली. त्यानंतर जैन मंदिरासमोर असणाऱ्या भुपाल शामराव गुरव यांच्या बंद घराचे कुलुप उचकटुन चोरट्यांनी तिजोरी आणि कपाटमधील ड्रावर उघडला. पण चोरट्यांना काहीच हाती लागल नाही चोरट्यांना रिकाम्या हातान परताव लागल. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे.