धनकवडी, बिबवेवाडीत भरदिवसा घरे फोडली; १० लाखांचा ऐवज लंपास

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद घातला असून, धनकवडी तसेच बिबवेवाडी भागात या चोरट्यांनी भरदिवसा बंद घरे फोडून किमती ऐवजावर डल्ला (Robbery in Pune) मारला आहे. दोन घरफोड्यात तब्बल १० लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. धनकवडी व बिबवेवाडीत या घटना घडल्या आहेत.

    पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद घातला असून, धनकवडी तसेच बिबवेवाडी भागात या चोरट्यांनी भरदिवसा बंद घरे फोडून किमती ऐवजावर डल्ला (Robbery in Pune) मारला आहे. दोन घरफोड्यात तब्बल १० लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. धनकवडी व बिबवेवाडीत या घटना घडल्या आहेत.

    याप्रकरणी नवनाथ कांबळे (वय ४०) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे बालाजीनगरमधील गणेश व्हिला सोसायटीत राहण्यास आहेत. गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त कुटूंबासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून आतील ५ लाख ६० हजारांचे दागिने चोरून नेले. नवनाथ कांबळे हे काम संपवून परत आल्यानतंर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

    दुसरी घटना बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मिलिंद भावसार (वय ६२ रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार अनंत वसाहत कोठारी ब्लॉक्समध्ये राहतात. ते देखील घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी फ्लॅट फोडून त्यांच्या घरातील साडेतीन लाखांचे दागिने, तीस हजारांची रोकड असा मिळून ४ लाखांचा ऐवज चोरून नेला. सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. अधिक तपास पोलीस करत आहेत.