धुळ्यात बंदुकीच्या धाकावर घरात दरोडा, दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीला सोबत घेऊन दरोडेखोर पसार; सहा संशयीत ताब्यात

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले आहे.

    धुळे :  धुळ्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. धुळ्यातील साक्रीत पाच ते सात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावरा एक घरातुन सोन्याचांदीचे दागिने आणि पैसे लंपास (robbers stolen jewellery and money ) केले. मात्र एवढ्यावरच न थांबत धक्कादायक बाब म्हणजे या दरो़डेखोरांनी घरात असलेल्या 23 वर्षीय तरुणीचं अपहरण केलं. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साक्री पोलिसांनी तपास सुरू करत सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

    नेमका प्रकार काय

    धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात हा धाडसी दरोडा पडला आहे. काही अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

    मामी भाची घरात टिव्ही बघत बसल्या होत्या

    मिळालेल्या माहितीनुसार, साक्री शहरातील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारातील सरस्वती कॉलनीत ज्योत्स्ना पाटील (40 वर्षे) राहतात. त्यांचे पती काही कामानिम्मत बाहेरगावी गेल्याने त्यांनी त्यांची भाची निशा शेवाळेला घरी बोलवुन घेतले. रात्री जेवणानंतर दोघीही घरात टीव्ही पाहत असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा त्यांना आवाज आला. घराचा दरवाजा उघडला असता घरात सहा अज्ञातांनी प्रवेश करत या दोघींना बंदुकीचा धाक दाखवत, कपाटातील 88 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशा शेवाळे अपहरण करून तिला सोबत घेऊन गेले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमधये भितीचं वातावरण पसरलं आहे.