सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमधल्या रुग्णांची सेवा आता रोबो करणार

सोलापूर: सोलापूर रेल्वे विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो.आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगवर उपाय शोधत सोलापुरातील

 सोलापूर: सोलापूर रेल्वे विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो.आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगवर उपाय शोधत सोलापुरातील भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना औषध-गोळ्या आणि पाणी देण्यासाठी रोबोची निर्मिती केली आहे. हा रोबो रुग्णांची सेवा शुश्रुषा करण्याबरोबरच त्यांच्याशी संवादही साधणार आहे. हा रोबो मोबाईलद्वारे ऑपरेट केला जाणार असल्याने तो संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाददेखील साधणार आहे. तसेच रुग्णांच्या तब्बेतीची दररोज विचारपूस करणार आहे. दरम्यान मंगळवारी हा रोबो रुग्णसेवेत दाखल झाला आहे. रोबोमुळे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी , नर्स,सफाई कामगार यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन लागण होण्याची शक्यता कमी होण्यास मदत झाली आहे  वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चिंता कमी करणारी ही बाब आहे. 

सोलापूर रेल्वे विभागातील यांत्रिक विभागाने अवघ्या तीन दिवसांत हा रोबो तयार केला आहे.सोलापूरच्या रेल्वे रुग्णालयात १९ कोरोनाचे रुग्ण दाखल झाल्यानंतर यांत्रिक विभागाने हा रोबो तयार केला आहे.काही तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर हा रोबो रेल्वे हॉस्पिटलमधील  रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.सोलापूर रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आयओएच डेपो मध्ये याची निर्मिती करण्यात आली असल्याचे रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी सांगितले.

 रोबो कोरोना बाधित रुग्णांना औषधे देणार आहे.यात ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने त्याद्वारे तो रुग्णांशी संवाद साधणार आहे.कोरोना बाधित रुग्णांची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी दरवेळेस डॉक्टरांना वॉर्ड मध्ये येण्याची गरज भासणार नाही.रोबोटद्वारे डॉक्टर रुग्णांवर नजर ठेवू शकतील.रुग्णांचे मनोधैर्य खचू नये म्हणून रोबो त्यांच्याशी संवाद साधणार असून प्रसंगी नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलू आणि पाहू ही शकणार आहे. रोबोमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्क कमीत कमी येईल.परिणामी डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. २४ तास रोबो रुग्णांची सेवा करणार आहे.त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.एकूणच रोबो कर्मचाऱ्यांना कोणत्याही आजारापासून दूर ठेवणार आहे.

रेल्वे हॉस्पिटलमध्ये आजमितीला तीन पाळीत केवळ ९ डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी आणखी ५ डॉक्टरांची गरज आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे डॉक्टर मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान कोरोना बाधित रुग्णाच्या सेवेसाठी  क रेल्वे ने रोबोट तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेच्या यांत्रिक विभागाने दोनच दिवसात रोबोची निर्मिती केली. काही तांत्रिक चाचणी पूर्ण करून हा रोबो मंगळवारी रुग्णाच्या सेवेत दाखल झाला आहे.  – डॉ.आनंद कुलकर्णी, सोलापूर रेल्वे हॉस्पिटल प्रमुख