‘नवराष्ट्र’कडून आदर्श युवा सरपंच, सरपंच सम्राट पुरस्कार जाहीर; उद्या होणार वितरण

सोलापूर शहर व जिल्ह्यात अल्पावधीतच वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या 'नवराष्ट्र'ने नेहमीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला आहे. नवभारत वृत्त समूहाच्या 'नवराष्ट्र' या वृत्तपत्राचा सरपंच कार्यसम्राट पुरस्कार सोहळा शनिवारी (दि.२३) हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पार पडणार आहे.

    माढा / बार्शी : सोलापूर शहर व जिल्ह्यात अल्पावधीतच वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘नवराष्ट्र’ने नेहमीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला आहे. नवभारत वृत्त समूहाच्या ‘नवराष्ट्र’ या वृत्तपत्राचा सरपंच कार्यसम्राट पुरस्कार सोहळा शनिवारी (दि.२३) हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पार पडणार आहे.

    आदर्श युवा सरपंच हा पुरस्कार माढा तालुक्यातील राहुलनगर गावच्या रोहनराज हनुमंत धुमाळ यांना जाहीर झाला आहे. वयाच्या २१ व्या वर्षी रोहनराज हा गावचा सरपंच झाला होता. सर्वात कमी वयात सरपंच होऊन केलेल्या गावात केलेल्या विविध कामांची दखल घेऊन आदर्श युवा सरपंच हा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.

    सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

    ग्रामीण भागातील गावचा गावगाडा पुढे नेणाऱ्या कारभाऱ्याचा सन्मान होणार आहे. नवराष्ट्रचा हा सन्मान रोहनराज धुमाळ यांना जाहीर झाल्याने त्यांचे उपसरपंच कल्पना शिंदे, ग्रामपंचायत सदस्य
    सुभाष शिंदे, उज्वला शिंदे, राजेंद्र भुई, चंद्रकला गायकवाड, वत्सला चव्हाण यांच्यासह ग्रामसेवक मस्तुद यांच्यासह ग्रामस्थांसह माढा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

    बार्शी तालुक्यातील मिरगणे, बारंगुळे, दराडे, मुंढे सरपंच सम्राट

    बार्शी तालुक्यातील मांडेगावचे सरपंच सुधाकर मिरगणे, भालगावच्या सरपंच भारती दराडे, अलिपुरचे सरपंच अशोक मुंडे आणि नागोबाचीवाडी लक्षाची वाडी या गट ग्रामपंचायतच्या सरपंच रागिनी बारंगुळे यांना सरपंच सम्राट पुरस्कार जाहीर झाला आहे.