सुजय विखेंच्या निलेश लंकेंना इंग्रजी भाषेच्या आव्हानावर रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषेवरुन कतृत्व…”

प्रचारावेळी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं खुलं आव्हान दिलं. सुजय विखेंनी आव्हान दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    बारामती – लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे जोरदार प्रचार चालू असून आरोप प्रत्यारोप यांचे सत्र सुरु आहे. अहमदनगरमध्ये निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचारावेळी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं खुलं आव्हान दिलं. सुजय विखेंनी आव्हान दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    सोशल मीडियावर रोहित पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे. सुजय विखे यांची प्रचार सभेतील व्हिडिओ शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाषा, शिक्षणाने कर्तृत्व सिद्ध होत नाही, अशा आशयाची पोस्ट करत आमदार रोहित पवारांनी लिहित जनतेची भाषा समजणे गरजेचे आहे असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

    लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही.  टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील!  अशा शब्दांत रोहित पवार यांनी सुजय विखे आणि नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला आहे.