
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असताना, अजित पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवार यांच्यावरसुद्धा टीका केली होती. आता त्यांच्या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेत ही भाजपची स्टटर्जी असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप हा अशाप्रकारचे डाव खेळत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांना लबाड लांडग्याची उपमा दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पडळकरांच्या वक्तव्याला भाजपला जबाबदार धरले आहे. त्यांनी याचा खरपूस समाचार घेत, ही भाजपची रणनीती असल्याचा आरोप केला आहे. भाजप छोट्या नेत्यांना पुढे करून तमाशा बघते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जहरी टीका
जिथं दिसतील त्या ठिकाणी चोप
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
अजित पवार समर्थ आक्रमक
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं.
पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही
वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं ही पाहायला मिळालं.