रोहित पवार राजकारण सोडणार!! काय केले आमदार रोहित यांनी ट्विट? 

काल शिवसेना प्रवक्ते आणि खा.संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी ईडीने चौकशी करून कारवाई करत त्यांना अटक केली आहे. दिवसभर कारवाई सुरू असताना राज्यभर वातावरण चांगलेच तापले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. शिवसेने सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर यानिमित्ताने गंभीर आरोप करत केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे, असे सांगितले जात आहे.

    अहमदनगर: काल शिवसेना प्रवक्ते आणि खा.संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी ईडीने चौकशी करून कारवाई करत त्यांना अटक केली आहे. दिवसभर कारवाई सुरू असताना राज्यभर वातावरण चांगलेच तापले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. शिवसेने सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर यानिमित्ताने गंभीर आरोप करत केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे, असे सांगितले जात आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याचे राजकारण हे समाजकारण न राहता केवळ सत्ताकारण झाले असून त्यामुळे आपल्याला आता राजकारणात रस राहिला नसल्याची भावना व्यक्त केली होती.

    आ.रोहित पवार यांनी काल खा.संजय राऊत यांच्या बाबत ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट करत, नितीन गडकरींनी नुकत्याच व्यक्त केलेल्या’भावने’ची आठवण करत, ‘दिवसभरातील राजकीय घडामोडी बघूनमा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय’, असे म्हंटलंय. मात्र पुढे ट्विट मधे आ.रोहित यांनी, ‘परंतु’ जोडत, ‘अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं!’, असंही स्पष्ट केलंय.

    अर्थात आ. रोहित पवार युवकांनामध्ये जाऊन पक्षाचे संघटन मजबूत करणार आणि भाजपला उत्तर देणार असेच त्यांना सुचवायचे असावे.