
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स झळकले आहेत. यावरउत्तर देताना असे फ्लेक्स लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नसत तर त्यासाठी बहुमताचा आकडा असावा लागतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पिंपरी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स झळकले आहेत. यावरउत्तर देताना असे फ्लेक्स लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नसत तर त्यासाठी बहुमताचा आकडा असावा लागतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंनदिवस नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एक मोठा गट घेऊनभाजसोबत गेले. त्यानंतर पवार कुटुंबात दोन फळ्या पडल्या आहेत. यातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारयांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात ये जा वाढली आहे.
रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यावर शुभेच्छांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. समर्थकांनी रोहित पवार यांच्या शुभेंच्यांच्या फलकावर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित पहिल्या वेळेचं आमदार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री पदाचा फ्लेक्स बाबत त्यांना विचारलेअसता ते असं कोणी मुख्यमंत्री होत नसतं त्याला मॅजिक फिगर महत्त्वाचा असतो.