
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अजित पवारांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
युवकांवर चर्चा करण्याची गरज
रोहित पवार म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी ते पुस्तक लिहीलं आहे, त्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. पण, सरकारला वाटत असेल तर त्याची शहानिशा करावी. पण कोणी कुठली जमीन घेतली, काय भ्रष्टाचार केला, कोणी कुठलं पद मिळवले, कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यावर चर्चा करण्यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे.
सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत
उद्या माझ्यावर चौकशी चालू आहे. माझ्यावर विविध स्वायत्त संस्था, पल्युशन बोर्ड, इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे. माझ्यावर चालू आहे तर मग सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.
नेमकं प्रकरण काय आहे?
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असे या पुस्तकात देण्यात आले आहे. मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एका खासगी बिल्डरला देण्यात दिली
तीन एकर जागा एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार होते, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी असताना, मला एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवाडा पोलिस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचे त्यांनी मला सांगितले.
या जमिनीला लिलाव
बोरवणकर यांनी पुढे सांगितलं की, विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की, या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी.
या जागेवर पोलिस कार्यालय उभारले
मी पालकमंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही. तीन एकर जागा एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार होते. मंत्र्यांनी माझं ऐकलं नाही, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण झाला, असा दावा मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. दरम्यान, या दाव्यानंतर आता राजकारण तापू लागले असून अजित पवार याबद्दल काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.