Candidate against Supriya Sule in Baramati Constituency Ajitdada Daon; We also fight hard; Rohit Pawar's Open Challenge
Candidate against Supriya Sule in Baramati Constituency Ajitdada Daon; We also fight hard; Rohit Pawar's Open Challenge

    नागपूर : राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूरातल्या टेकडी रोड परिसरात समारोप झाला. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आता विधान सभेत कार्यकर्ते पोहचणार आहेत. यामध्ये कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. शरद पवारांचे भाषण झाल्यानंतर सरकारमधील कोणीही पदाधिकारी आंदोलनस्थळी न पोहचल्याने सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

    महाराष्ट्राच्या सरकारवर जोरदार टीका

    यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला करीत, महाराष्ट्राच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर आमदारांची राज्यात अशी अवस्था असेल तर सामान्य गरिबाची काय अवस्था असेल, असा खडा सवालसुद्धा रोहित पवार यांनी उचलला आहे. संघर्ष जोरात पेटलेला असताना, आमच्या समस्या कोणीही ऐकायला तयार नसल्याने आम्ही आता विधानसभेत जाणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले.

     

    रोहित पवार आणि रोहित पाटलांचा पोलिसांसोबत संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.