रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर, सचिवपदी अरविंद गरगटे  यांची निवड

रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची तर सचिवपदी अरविंद गरगटे यांची एकमताने निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात प्रांतपाल अनिल परमार व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते दरेकर, गरगटे यांना अधिकार सुपूर्द करण्यात आले.    

    बारामती:  रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची तर सचिवपदी अरविंद गरगटे यांची एकमताने निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात प्रांतपाल अनिल परमार व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते दरेकर, गरगटे यांना अधिकार सुपूर्द करण्यात आले.

    सामाजिक उपक्रमांचा संकल्प
    डॉ. अजय दरेकर यांनी बारामती तालुक्यातील सर्व ६५ विद्यालयांसोबत सॅनिटरी नॅपकीन वाटप, वृक्षारोपण, नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा असे विविध उपक्रम राबविण्याचा तसेच सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांना ऊसतोडीवेळी उपयोगी पडणारे साहित्य पुरविण्याचा संकल्प मांडला. याप्रसंगी रोटरी क्लबमध्ये डॉ. प्रवीण ताटे, अभिजित बर्गे, चेतन खटावकर, सुजय व्होरा, आनंद गादिया यांनी नूतन सदस्यपदाची नोंदणी केली.
    नूतन कार्यकारिणी
    रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या उपाध्यक्षपदी डॉ. हनुमंत पाटील, खजिनदारपदी रविकिरण खारतोडे,  पदसिध्द सदस्य म्हणून दर्शना गुजर, संजय दुधाळ, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोर मेहता, अलीअसगर बारामतीवाला, गणेश कुंभार, मल्लिकार्जुन हिरेमठ, डॉ. सचिन मदने, सचिन चावरे, प्रतिक दोशी, कौशल शहा, प्रिती पाटील, दत्ता बोराडे यांना संधी मिळाली.