ना कुठं पैसे पाठवले, ना खर्च केले तरीही खात्यातून 61 हजार गेले; ‘इथं’ घडलाय धक्कादायक प्रकार

वरूड येथील रहिवासी एका तरुणाच्या दोन बँक खात्यातून परस्पर 61 हजार रुपये (Fraud in Amravati) काढून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. वरूडातील साईनगर भागात राहणारा 30 वर्षीय तरुण हा घरी होता.

    अमरावती : वरूड येथील रहिवासी एका तरुणाच्या दोन बँक खात्यातून परस्पर 61 हजार रुपये (Fraud in Amravati) काढून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. वरूडातील साईनगर भागात राहणारा 30 वर्षीय तरुण हा घरी होता. त्यावेळी त्याला त्याच्या एका बँकेच्या खात्यातून 50 हजार रुपये तर दुसऱ्या बँकेच्या खात्यातून 11 हजार असे एकूण 61 हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाइलवर प्राप्त झाला.

    कुणालाही पैसे ट्रान्सफर केले नसल्याने त्यांना शंका आली. तरीही खात्यातून पैसे काढण्यात आल्याच्या संदेशाची तरुणाने चौकशी केली. त्यावेळी त्याला कुणीतरी अज्ञाताने त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे तरुणाने वरूड ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.