स्ट्रीट लाईटच्या खांबावर पथदिवे बसविण्यासाठी रासपचे ठिय्या आंदोलन

स्ट्रीट लाईटच्या खांबावर पथदिवे बसविण्यासाठी रासपचे ठिय्या आंदोलन.

    बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीमधील जळोची, रूई तांदुळावाडी परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून स्ट्रीट लाईटचे नुसतेच पोल उभा केलेले आहेत. परंतु, त्यावर अद्याप पथदिवे लावले नाहीत, त्यामुळे या विद्युत खांबावर पथदिवे बसविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

    याबाबत काही दिवसांपुर्वी नगरपरिषदेला लेखी पञ देऊन लवकरात लवकर या मागणी कडे लक्ष देऊन त्याची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला होता, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याचे रासप चे तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर यांनी सांगीतले. या वाढीव हद्दीच्या परिसरातील नागरीक दररोज आपल्या भागातील रस्ते प्रकाशमान होतील, याची वाट पाहत आहेत. परंतु नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे.नगरपरिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेत नसल्याने आम्ही येणाऱ्या काळात याच उभा केलेल्या पोलवरती आगीचे टेंबे जाळू, असा इशारा समाज पक्षाच्या वतीने या वळी देण्यात आला.

    या आंदोलनावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे, तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर, शुभम मोरे,विठ्ठल देवकाते, काकासाहेब बुरूगंले,महादेव कोकरे,रेवण कोकरे,नवनाथ मलगुंडे, भीवा मलगुंडे, शाम घाडगे, किशोर सातकर, अमोल भुजबळ,निखील दांगडे, भुषण सातकर, शंतनु देवकाते आदी उपस्थित होते.