पुण्यात रासपची ताकद वाढणार; शिवसेनेच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश

आज पुण्यात महादेव जानकर यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात पक्ष प्रवेश केला. यामध्ये शिवसेना पर्वती विभाग महिला अध्यक्ष कविता जावळे व त्यांच्या 100 कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये प्रवेश झाला आहे. महादेव जानकर यांच्या आदेशानुसार त्यांना पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन देण्यात आले आहे.

    पुणे : राज्यात लवकरच महापालिका निवडणूका होणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर सर्व पक्षानी तयारीला सुरुवात केली आहे. त्यातचं आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर पूर्ण ताकतीने उतरणार असल्याची माहिती, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली होती.

    दरम्यान त्या अनुषंगाने आज पुण्यात महादेव जानकर यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात पक्ष प्रवेश केला. यामध्ये शिवसेना पर्वती विभाग महिला अध्यक्ष कविता जावळे व त्यांच्या 100 कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये प्रवेश झाला आहे. महादेव जानकर यांच्या आदेशानुसार त्यांना पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन देण्यात आले आहे.

    तसेच पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी रासपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सविता जोशी, पुणे जिल्हा अध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता किरवे, युवक अध्यक्ष उमेश कोकरे, पुणे शहर उपाध्यक्ष- प्रसाद कोळेकर, सचिव राजेश लवटे, संपर्क प्रमुख वैजनाथ स्वामी, प्रचार प्रमुख करण शिवतारे, कार्यकारिणी सद्दस्य अजय ढवळे, नामदेव सुळे, विधानसभा अध्यक्ष संजय सदलापूरे, सोशल मीडिया अध्यक्ष बिरुदेव अनुसे, तुषार वानखेडे,  कोळेकर उपस्थित होते.