राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) अकोला दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी आळशी प्लॉट येथील गीताई येथे नगरसंघचालक गोपाल खंडेलवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. गोपाल खंडेलवाल यांचे पुत्र मधुर यांनी त्यांचे स्वागत केले.

    अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) अकोला दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी आळशी प्लॉट येथील गीताई येथे नगरसंघचालक गोपाल खंडेलवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. गोपाल खंडेलवाल यांचे पुत्र मधुर यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सरसंघचालक मोहन भागवत यांना निवेदन देण्याचे घोषित केले होते. पण, भागवत यांची सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था पाहता ‘वंचित’ला आंदोलन गुंडाळावे लागले.

    सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोवर्धन शर्मा यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर पोलिसांमार्फत ‘वंचित’चे निवेदन स्वीकारले. ‘वंचित’ने एक निवेदन तयार केले होते. त्या निवेदनात देशात सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात विविध समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न, धार्मिक ध्रुवीकरण, त्यातून निर्माण होणारे सामाजिक तणाव, समाजातील विविध समूहांची चिघळत जाणारे अनेक प्रश्नांचे मूळ हे समाजात असलेली असमानता आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित कल्याणकारी राज्य या संकल्पनेला छेद देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ‘वंचित’ने केला.

    आरएसएसने ज्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्या भाजपने सत्तेवर आल्यापासून केंद्रात व राज्यात कायम दुफळीचे आणि अराजकतेचे धोरण अवलंबले आहे, असा आरोप ‘वंचित’ने केला आहे. यासंदर्भात आरएसएसने तातडीने पुढाकार घेऊन भाजपला निर्देश देत उपरोक्त परिस्थितीवर कायदेशीर उपाययोजना करून होणारा नरसंहार व सामाजिक असंतुलन टाळावे, असे ‘वंचित’च्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी वंचित नेत्यांना असे निवेदन देता येणार नाही, असे घोषित केले.

    पोलिसांनी स्वीकारले अखेर ‘वंचित’चे निवेदन

    सरसंघचालक मोहन भागवत यांना निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंद भिरड, मजहर खान, महासचिव गजानन गवई, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे आदी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने निवेदनाची कॉपी पोलिसांना दिली, असे ‘वंचित’ ने कळविले आहे.