Ruby Hall Clinic Kidney Racket Case in Pune; Dr. Charges filed against 15 people, including Grant

रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणी डॉ. ग्रँटसह 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे(Ruby Hall Clinic Kidney Racket Case in Pune; Dr. Charges filed against 15 people, including Grant).

    पुणे : रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणी डॉ. ग्रँटसह 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे(Ruby Hall Clinic Kidney Racket Case In Pune; Dr. Charges filed against 15 people, including Grant).

    शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कागदपत्रांची खात्री केली नाही आणि आपली दिशाभूल करत किडनी बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    हे प्रकरण मार्चमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रुबी हॉल क्लिनिकची प्रतिक्रिया आली असून त्यांनी आपल्या डॉक्टरांवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    दरम्यान, क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सदरे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डॉक्टर संजोग सिताराम कदम यांनी तक्रार दिली होती.