काळुनदीवरील रूंदे पुल पाण्याखाली १०ते१२गावाचा तुटला संपर्क, जनजीवन विस्कळीत

कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल शुक्रवारी सकाळच्या सुमारास पाण्यात खाली गेल्याने १० ते१२गावाचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    टिटवाळा: काळु नदी वर असणाऱ्या रूंदे पुल १९९८ साली बांधण्यात आला असुन पुलाची साधरण लांबी १२८मीटर, रूंदी साडेसात मीटर असुन लो लेव्हल (सब मार्शिबल) ब्रीज प्रकारात असल्याने नेहमीच पावसाळ्यात अतिवृष्टीत काळुनदीच्या पाण्याखाली पुल जात असल्याने येथील रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव उशीद,मढ, दानबाव, पळसोली, शेई,अंबरजे,काकडपाडा, कुंभारपाडा, ,गेरसे आदी १०ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटतो.

    पाण्या खाली गेलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने आणि नवीन पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रूंदे पुल पाण्याखाली जात असल्याने वासिंद खडवली टिटवाळा भागाशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असून रूग्णांना, शालेय विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसाय करणा-या अनेक नागरिकांना यांचा फटका बसत असुन यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

    कल्याण तालुक्यातील रुंदे काळू नदीवरील यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ८ वेळा पाण्याखााली गेल्याने जनजीवन विस्कळीत होते. आता तरी प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देत नवीन उंच पुल बांधवा अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु लागली असल्याचे रूंदे येथील रहिवाशी परमवीर पाटील यांनी सांगितले. याबाबत कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांच्या शी संपर्क साधला असता अतिवृष्टी मुळे रुंदे पुल पाण्याखाली गेला असून पर्यायी मार्ग सुरू असल्याचे सांगितले.