Rupali Patil Thombre's stern warning to Ketki Chitale

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भडकावू ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या केतकी चितळे च्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे(Rupali Patil Thombre's stern warning to Ketki Chitale).

  पुणे : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भडकावू ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या केतकी चितळे च्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे(Rupali Patil Thombre’s stern warning to Ketki Chitale).

  ‘कोण केतकी चितळे, तीच वय काय? ती तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला अशी भाषा वापरते. एक तर ही मनोरुग्णाने गंजाडी अभिनेत्री आहे. त्यात तिने लिहिले आहे की, ब्राम्हणांचा मस्तर काय संबंध आहे का? जातीय तेढ वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो कुठल्या लेव्हल पासून कुठल्या लेव्हल पर्यंत सतत बिंबवण्याचे हे जे पोरखेळ चालू आहेत ना त्वरित बंद झाले पाहिजे अस रुपाली पाटील म्हणाल्या.

  मुळात केतकीच तेवढं वय सुद्धा नाही की तिने पवार साहेबांवर असं वक्तव्य करावे. केतकी चितळे आजारी असून तिच्यावर मानसिक उपचार सुरू असून तिच्या आईवडिलांचं दुर्देव म्हणावं लागेल की तिला त्यांनी संस्कार दिलेले नाहीत. तिने पोस्ट करताना कुणी तरी ऍड. नितीन भावे याच नाव खाली लिहिले आहे. मला नाही वाटत कुणी नितीन भावे वगैरे असतील.

  परंतु केतकने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे, तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे. पहिली गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची तिची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, तिला कोणाताही अर्थ नाही. मात्र त्यामुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या ना ती तिच्या आजारातून लवकर बरी होईल.

  तिचा नंबर आम्ही फेसबुकला टाकणार आहोत. ती जे काही बोलली आहे वाईट साईट त्याच्या अंत्यत खालच्या दर्जात तिला कमेंट करायला सांगणार आहोत. यांच्यामध्ये बदनामी केली म्हणून 504 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल करून असे विकृत जागेवर येत नसतात, आणि केतकी सारखे तर नाहीच नाही.

  मध्यंतरी ट्रोलर्सनी विरोधात बोलू नये, मात्र तिने आता कळसच गाठला आहे, छडी वाजे छम छम या उक्ती प्रमाणे तिला छड्या दिल्या की, ती जागेवर येईल आणि तिचे संस्कारही जागेवर येतील, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.