Asian Games 2023
Asian Games 2023

  पुणे : चीनमधील एशियन गेम्समध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक विजेती महाराष्ट्राची कन्या ऋतुजा भोसले हिने आज पुणे श्रमिक पत्रकारसंघात माध्यमांशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी तिने आतापर्यंत तिचा प्रवासासह फायनल मॅचचा थरार सांगितला. तसेच, रोहणसोबत तिच्याखेळाबद्दल मजेशीर किस्से सांगितले. दरम्यान, तिने यशाबद्दल आई-बाबांचे विशेष आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी तथा पदाधिकारी उपस्थित होते.

  मुलींना घरातून सपोर्ट मिळणे गरजेचे

  ऋतुजाने रोहण बोपण्णासोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घालत महाराष्ट्रासह भारताचे नाव मोठे केले. ऋतुजाने यावेळी तिच्या टेनिस खेळातील मुलींच्या सहभागाबद्दल निश्चितच कमतरता असल्याचे कबूल करीत मुलींना घरातून सपोर्ट मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता मुलींना कमजोर समजू नये, त्यांचे कष्टसुद्धा फळाला येऊ शकतात. तिने मिळवलेले मेडल तुमचे, कुटुंबाचे, देशाचे नाव मोठे करू शकते, असा विश्वास तिने व्यक्त केला. यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे तिचे कुटुंब असल्याचे तिने म्हटले आहे.

  अंडर 18 मध्ये मिळवलेली पहिली गोल्डमेडलीस्ट

  तिच्या य़शाचे श्रेय तिने तिच्या आईबाबांना दिले. तसेच, तिच्या पूर्ण टीमचेदेखील आभार मानले यामध्ये कोचसह, सायकोलॉजिस्ट, प्रशिक्षण देणारे अनेक प्रशिक्षकांचे आभार मानले. बाबांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास आणि आईने केलेली मदत याजोरावर एवढे मोठे दिव्य ती पार करू शकली, असे ऋतुजाने सांगितले. महाराष्ट्रातील ती एकमेव स्पर्धक आहे जिने एशियन गेम्समध्ये अंडर 18 मध्ये गोल्डमेडल मिळवले होते. त्यानंतर ती अमेरिकेला गेल्यानंतर तिथे टेनिस खेळू लागली. त्यावेळी तिच्या आईबाबांनी खूप मोठा सपोर्ट केला.

  अमेरिकेमधून आल्यानंतर पहिल्यापासून सुरुवात

  तिने अमेरिकेला जायचे की नाही यावर बराच वाद होता. परंतु, तिच्या आई-बाबांनी शिक्षण हेसुद्धा महत्त्वाचे आहे असे म्हटले त्यानंतर ती अमेरिकेला गेली. त्यानंतर पुन्हा इंडियात परत आल्यानंतर तिला पहिल्यापासून सुरुवात करावी लागली.

  टेनिसमध्ये करियर करू देणे हेच दिव्य

  तिच्या आई-वडिलांना टेनिसमध्ये करियर करू देणे, हेच मोठे दिव्य असल्याचे मत तिने व्यक्त केले. यावेळी तिच्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांनी दाखवलेल्या विश्वास आणि पाठबळाला दिले.

  रोहण बोपण्णासोबतचा प्रवास

  रोहण बोपण्णसोबत तिचा प्रवासावर तिने आनंद व्यक्त केला. रोहण बोपण्णाने तिला तिचा पार्टनर म्हणून स्वीकार करणे हे खूप मोठे पदक असल्याचे मत तिने व्यक्त केले. रोहणने तिला कोठेही जाणवू दिले नाही की, तो एवढा मोठा लेजंड आहे उलट तो तिला खेळण्यासाठी चांगल्या रिझल्टसाठी सतत प्रोत्साहित करीत होता. त्याने तिला जय भवानी, तसेत सह्याद्री म्हणत इनकरेज केले.

  फायनचा सामना क्षणक्षणाला रोमांचक ठरला

  फायनलच्या पहिल्या राऊंडला ते कमी पडले. आता तिला खूप नर्वसपणा आला होता. परंतु, रोहण बोपण्णाने तिला आपण साईड बदलून खेळू आणि तिने त्यानंतरचे राऊंड जिंकले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. खेळत असताना तिला टेन्शन होते, परंतु रोहणने तिला इनकरेज करीत बेस्टसाठी खेळू दिले. मग दोघांनी दुसऱ्या राऊंडनंतर चांगला खेळ दाखवत मोठा विजय प्राप्त केला

  स्पोन्सर्स आणि असोसिएशच्या साह्याने तुमचे फायनान्शिय प्रोब्लेम कमी

  या सर्व प्रवासात तिने नवीन मुलींना टेनिसमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी पालकांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या खेळामध्ये फायनान्शियल प्रोब्लेम येत असले तरीही तुम्ही स्पोन्सर्सचा सपोर्ट घेऊ शकता. त्याचबरोब अनेक असोसिएशन आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता असे मत ऋतुजाने व्यक्त केले. यामध्ये तिने तिला मिळत असलेला पुनित बालन ग्रुपचे आभार मानले.