राज्यपालांची हकालपट्टी करा, आमदार अमोल मिटकरी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले होते, यावेळी राज्यपाल हटावची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पत्र लिहून राज्यपाल हटावची मागणी पत्रातून केली आहे.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात “जोडो मारो आंदोलन” केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    दरम्यान, काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले होते, यावेळी राज्यपाल हटावची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पत्र लिहून राज्यपाल हटावची मागणी पत्रातून केली आहे. राज्यपालांच्या विरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांना केंद्रात परत पाठवा…राज्यपाल हटाव या मागणीला जोर धरु लागला आहे. असं असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा अशी मागणी केली होती, यानंतर आज आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून राज्यपाल हटावची मागणी पत्रातून केली आहे. त्यामुळं या पत्राची दखल पंतप्रधान घेणार का? हे पाहावे लागेल.

    काय म्हणाले राज्यपाल?

    दरम्यान, आज मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. मात्र आता नवीन काळातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असं राज्यपालांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मविआ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांवर टिका होत आहे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. याआधी सुद्धा राज्यपालांनी  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

    पूर्वी काय म्हणाले होते राज्यपाल?

    राजभाषा मराठी दिनानिमित्त औरंगाबादमध्ये श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. त्यामुळं समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं राज्यपाल म्हणाले होते, तेव्हा त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.