CM Uddhav Thackeray Vs Sadabhau Khot

शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे(Sadabhau Khot criticizes Chief Minister Uddhav Thackeray).

    रत्नागिरी : शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे(Sadabhau Khot criticizes Chief Minister Uddhav Thackeray).

    राज ठाकरे  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल असंही सदाभाऊ यावेळी म्हणाले.

    गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे माकडासारखे टाळ्या वाजवत होते, आणि आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची माकडं रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेली आहेत. याच्या एवढी शोकांतिका या राजकारणामध्ये असू शकत नाही, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.