ऊसाचा फड पेटला अन् निष्ठुर व्यवस्थेनं नामदेवची राख केली, सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टिका

बीड जिल्ह्यातील हिंगणगाव ह्या ठिकाणी आज सकाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. ही आत्महत्या झाल्याचं ज्यावेळी समजलं त्यावेळी खऱ्या अर्थानं मन सुन्न झालं. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा ही राज्यव्यापी यात्रा घेऊन 29 एप्रिलला आम्ही शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सीमोल्लंघन केलं. ऊसाचा फड पेटला अन् निष्ठुर व्यवस्थेनं नामदेवची राख केली, सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टिका केली आहे. नामदेवची आत्महत्या ही राज्य सरकारने घेतलेला बळी आहे, अशी टिका सदाभाऊ खोतांनी राज्य सरकारवर केली आहे.

    मुंबई : बीड जिल्ह्यातील हिंगणगाव ह्या ठिकाणी आज सकाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. ही आत्महत्या झाल्याचं ज्यावेळी समजलं त्यावेळी खऱ्या अर्थानं मन सुन्न झालं. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा ही राज्यव्यापी यात्रा घेऊन 29 एप्रिलला आम्ही शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सीमोल्लंघन केलं. ह्याची सुरुवात सिंधुदुर्ग किल्ल्यावरून झाली. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची रयत आज संकटात आहे. एकेक जिल्हा करत आम्ही जळगाव जिल्ह्यात आलो. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांचा फोन आला आणि ते जे बोलले ते ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो.

    काळजावर दगड ठेवून मी जालना परभणी हे जिल्हे पार करुन, हिंगोलीला दिवसभर दौरा केल आणि संध्याकाळची सभा थांबवून आम्ही तातडीने गेवराईला आम्ही निघालो. अडीचशे किलोमीटरचं अंतर कापून रात्री उशीरा देवराई मध्ये आलो. सकाळी माझे सहकारी आ. लक्ष्मण अण्णा पवार ह्यांना बरोबर घेऊन हिंगणगावच्या दिशेने आम्ही निघालो. गावात च रस्त्यालगतच नामदेव जाधव ह्या तरुण शेतकऱ्याचं शेत दीड एकर पेटलेला ऊस, काळाठिक्कर पडलेलं सगळं शेत डोळ्यानं पाहिलं आणि शेताच्या मधोमध लिंबाचं झाड त्यावर नामदेव चढतो आणि आपल्या मेहुण्याला फोन लावून सांगतो माझा ऊस कारखान्याला जात नाही, मला जगायची आता इच्छाच राहिली नाही आणि मोबाईल फेकून देतो. इतकं बोलून गळ्याला दोरीचा फास लावून झाडावरून खाली लटकतो. मेहुण्याने गावातील ओळखीच्या माणसाला फोन करून कळवल्यानंतर सगळं गाव उसाच्या फडाच्या दिशेने धावायला लागलं.

    दरम्यान, चारी बाजूने उसाचा फळ पेटलेला आणि वणवा भडकलेला. नामदेवला सारं गाव हुडकतं पण नामदेव शिवारात दिसत नसतो. पण नामदेव लिंबाच्या झाडाला आत लटकत असेल ह्याचा थोडाही मागमूस गावाला नसतो. आत शिरावं तर आगीचा वणवा गाव हताशपणे उसाचा पेटता फड विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं. पण आग थांबल ती कसली. ऊसाच्या फडाची राख झाल्यावर लिंबाच्या झाडाला लटकत असेलला नामदेवाचा देह गावकऱ्यांच्या नजरेला पडतो. उसाचं ताटव झालं. उसाचं वजन आता अर्ध्याहून कमी होणार होतं. आता सावकाराचं कर्ज कसं फेडायचं सावकार आपली जमीन बळकावणार. आता लेकराबाळाला जमिनीचा तुकडा सुद्धा रुजणार नाही. एका बाजूला कर्जाचा डोंगर दुसऱ्या बाजूला बाजूला हातची जमीन सावकाराच्या घशात जाणार मग घरादाराला कसं तोंड दाखवू ह्या चिंतेनं नामदेवला ग्रासलं होतं. नामदेव गावातल्या लोकांना म्हणत असे मला आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही पण कुणीच मनावर घेतलं नाही. अखेर नामदेवने ह्या व्यवस्थेसमोर हात टेकले आणि ह्या जगाचा निरोप घेतला. नामदेव हा राज्य सरकारने घेतलेला बळी आहे, अशी टिका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय.