सदाभाऊंनी झेडपीच्या चादरी नाकारल्या; पीआरसीची वादळी सुरुवात

झेडपी प्रशासनाकडून पीआरसी कमिटीला स्वागतपर चादरी देत असताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चादरी नाकारल्या. चादरीचा बंडल जेव्हा आमदार विक्रम काळे यांच्या हाती पडल्या. तेव्हा त्यांनी या बंडलमध्ये चादरी आहेत म्हणून सांगा सर्वांना, अन्यथा त्याचा वेगळा अर्थ निघेल म्हणून प्रशासनाला सूचना केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : झेडपी प्रशासनाकडून पीआरसी कमिटीला स्वागतपर चादरी देत असताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चादरी नाकारल्या. चादरीचा बंडल जेव्हा आमदार विक्रम काळे यांच्या हाती पडल्या. तेव्हा त्यांनी या बंडलमध्ये चादरी आहेत म्हणून सांगा सर्वांना, अन्यथा त्याचा वेगळा अर्थ निघेल म्हणून प्रशासनाला सूचना केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

    दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या स्वागताला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी गेले. त्यांनी त्यांना बुके दिला. जेव्हा चादरीचा बंडल स्वामी देत होते. मात्र, त्यांनी सदाभाऊ खोत यांनी तो स्पष्टपणे नकार दिला. सीईओ स्वामी यांनी विनंती केली, तरीही सदाभाऊंनी चादरीचा बंडल घेतला नाही. त्यानंतर सर्वांचे स्वागत करून पीआरसी बैठक वादळी सुरुवात झाली.

    सोलापूर झेडपीत पीआरसी कमिटी दाखल झाली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झेडपी कारभाराची तपासणी अणि साक्ष घेण्यात येत आहे. प्रारंभी पीआरसी चेअरमन संजय रायमुलकर यांचे स्वागत सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. आमदार विक्रम काळे, सदाभाऊ खोत, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आमदार मंत्रालयीन अधिकारी यांची उपस्थिती होती.

    साक्ष घेण्यापूर्वी झेडपी अधिकाऱ्यांची ओळख परेड घेण्यात आली. चेअरमन संजय रायमुलकर हे आसन ग्रहण करण्यापूर्वीच झेडपी अधिकारी असनस्थ होताचं आमदार विक्रम काळे यांनी झेडपी अधिकाऱ्यांना सुनावले. अध्यक्ष बसण्यापूर्वीचं तुम्ही का बसता? तुम्हाला घाई असेल तर तुम्ही जाऊ शकता असे बोल सुनावले.