सदाभाऊ खोत यांनी घेतला अर्ज मागे, १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात, विधानपरिषद निवडणूक होणारच

राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना (Congress, NCP and Shivsena) यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. मात्र शेवटच्या दिवशी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

    मुंबई : नुकत्यात राज्यात राज्यसभेच्या निवडणुका (Rajya sabha election) पार पडल्या. आता या निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांची (Legislative Council election)  जोरात चर्चा सुरु असून, पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकासाठी मतांची जुळवाजुळवी तसेच रणनिती आखयला सुरुवता झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपचा (BJP) आत्मविश्वास उंचावला असून भाजपाने विधान परिषदेसाठीही आमदारांच्या गाठीभेटी तसेच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आपले ५ उमेदवार (BJP 5 Candidate) रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत होते, मात्र आज शेवटच्या दिवशी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज (Application) मागे घेतला आहे.

    दरम्यान, राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना (Congress, NCP and Shivsena) यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. मात्र शेवटच्या दिवशी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

    शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Rayat Kranti Sadabhu Khot) यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले होते की, राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे ज्यांनी त्यांना घोडे म्हणावे त्यांना घोडा लागेल. असं सदाभाऊ खोत यांनी टिका केली.