सदाभाऊ खोत यांची एंन्ट्री महाविकास आघाडीला भारी पडणार; भाजपचा जबरदस्त गेम प्लान

विधान परिषदेच्या रिंगणात भाजपने सहावा खेळाडू उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. प्रत्यक्षात भाजपने पाच उमेदवार घोषित केले. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. सदाभाऊ यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे(Sadabhau Khot's application as an independent in Rajya Sabha elections).

    मुंबई : विधान परिषदेच्या रिंगणात भाजपने सहावा खेळाडू उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. प्रत्यक्षात भाजपने पाच उमेदवार घोषित केले. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. सदाभाऊ यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे(Sadabhau Khot’s application as an independent in Rajya Sabha elections).

    पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

    सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.