चालत्या गाडीतून पडूनही साधूचे वाचले प्राण, मनमाड रेल्वे स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना

रेल्वेस्थानकावरील फलाटावरून चूकून तोल जाऊन ते रुळावर पडले. मात्र रुळावर मधोमध पडल्यानं त्यांच्या अंगावरुन गाडी जाऊनगी ते बचावले. यावेळी रेल्वेस्थानकावरील बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

    नाशिक : काळ आला होता वेळ आली नव्हती अशी म्हण आहे. पण याचाच प्रत्यय काल मनमाड रेल्वे स्थानकावर आला. सोमवारी चालत्या गाडीतून पडल्यानंतर देखील एका साधूचे प्राण वाचल्याची घटना घटली आहे. रेल्वेस्थानकावरील फलाटावरून चूकून तोल जाऊन ते रुळावर पडले. मात्र रुळावर मधोमध पडल्यानं त्यांच्या अंगावरुन गाडी जाऊनही ते बचावले. यावेळी रेल्वेस्थानकावरील बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

    नाशिकच्या मनमाड रेल्वेस्थानकावर काल गाडी सुटत असताना एक साधू थेट रुळावर जाऊन पडले. ते पाहून उपस्थितांनी डोळे बंद केले त्यांना वाटलं की  साधू गाडी खाली सापडले असणार. मात्र साधू रुळाचे मधोमध पडले होते.दु सऱ्या बाजूच्या लोकांनी त्याला पाहिल्यानंतर तसाच पडून राहा, कोणतीही हालचाल करू नको, डोकेवर काढू नका असा सल्ला दिला. त्यानुसार साधू तसेच पडून होते.  त्याच्या अंगावरून 6 ते 7 डबे गेले अखेर गाडी थांबली आणि साधू सहीसलामत बाहेर आले. अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार एका वेंडरने त्याच्या मोबाइल मध्ये कैद केला असून साधूचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याला जीवदान मिळाले.