उत्तर प्रदेशच्या साधूंना महाराष्ट्रात मारहाण, मुलं पळवणारे असल्याचा होता संशय

उत्तर प्रदेशचे चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांनी मार्गाबद्दल स्थानिकांना विचारणा केली. त्याची भाषा ही न कळल्याने लोकांना त्यांच्यावर संशय आला. मुलं चोरणारी टोळी समजून चौघांनाही गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण करण्यात आली

    सांगली : मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून साधूंना मारहाण केल्याची घटना सांगलतील जत तालुक्यात उघडकीस आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली. हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते कर्नाटकात जात होते. मात्र स्थानिकांना त्यांची भाषा न समजल्याने हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

    उत्तर प्रदेशचे चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांनी मार्गाबद्दल स्थानिकांना विचारणा केली. त्याची भाषा ही न कळल्याने लोकांना त्यांच्यावर संशय आला. मुलं चोरणारी टोळी समजून चौघांनाही गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण करण्यात आली. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवण्यात आलं. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.