
डेप्युटी आरटीओ अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सोलापूर आरटीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी रस्ते जनजागृतीसाठी सुरू केलेला "सुरक्षा कवच" उपक्रम राज्यभर राबविणार असल्याचे महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत सांगगितले.
सोलापूर : डेप्युटी आरटीओ अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सोलापूर आरटीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी रस्ते जनजागृतीसाठी सुरू केलेला “सुरक्षा कवच” उपक्रम राज्यभर राबविणार असल्याचे महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत सांगगितले.
आपघात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान आयूक्तस्तरावर बैठका घेण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्र मध्ये ६५ %. आपघाती मृत्यु आहे. जानेवारी फेब्रुवारी महीन्यात सोलापूर जिल्ह्यात आपघातात ३ % घट झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासनाने आरटीओ कार्यालयाशी चांगला समन्वय ठेवल्यामूळे आपघात रोखण्यास मदत होत आहे. जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात दुचाकी आपघाताचे प्रमाण वाढत असल्याने प्रत्येक तालूक्यासाठी ११ नोडल ऑफीसर नेमण्यात आले आहेत. आशी ही माहिती आयुक्त भीमनवार यांनी दिली.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार हे प्रशासकीय कामानिमित्त दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी त्यांनी आरटीओ कार्यालयास भेट दिली.
यावेळी त्यांनी प्रथम आरटीओ कार्यालयात स्थापन केलेल्या सुरक्षा कवच या कक्षाला भेट दिली. यावेळी डेप्युटी आरटीओ अर्चना गायकवाड यांनी रस्ता सुरक्षेची शिकवण ही शालेय वयापासूनच झाली पाहिजे यासाठी सुरक्षा कवच कक्ष स्थापन केल्याचे सांगितले. यात रस्ता सुरक्षेचे संदेश देणारे विविध मनोरंजनात्मक खेळ उभे केले आहेत. यामध्ये रस्ता सुरक्षेची सापशिडी, रस्ता सुरक्षा ट्री रोड सेफ्टी ओथ वॉल, रस्ता सुरक्षेची शपथ व प्रतिज्ञा यांचा समावेश करण्यात आला आहे.
आपत्कालीन वाहनांना मार्ग द्या, याची जनजागृती करणारे सुरक्षा कवच कक्षात प्रतिक्रिया नोंदविताना परिवहन आयुक्त भीमनवार यांनी माॅडेल कक्षामध्ये कार्यान्वित केले आहे. सुरक्षा कवच चा कक्ष वाहतुकीच्या नियमांच्या चित्रांनी खास रंगविण्यात आला आहे. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर का आणि कशासाठी करावा यासाठी कक्षाबाहेर सेल्फीपॉइंट उभा केला आहे. कार्यालय परिसरातील झाडांवर वाहतुकीचे नियम सांगणारे फलक आहेत. सुरक्षा कवच कक्षातील उपक्रम पाहून आयुक्त भीमनवार यांनी डेप्युटी आरटीओ गायकवाड यांचे कौतुक केले.
पत्रकार परिषदेस डेप्युटी आरटीओ अर्चना गायकवाड. परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, विजय तिराणकर, मोटार वाहन निरीक्षक महेश रायभान, यावेळी कोल्हापूर, सांगली अपघाताचा आढावा घेतला. यावेळी कोल्हापूरचे आरटीओ दीपक सुखदेव पाटील, किरण खंदारे, पाटील, सांगलीचे डेप्युटी आरटीओ राहुल खंदारे, पल्लवी पांडव, शिरीष सगरे उपस्थित होते. त्यानंतर पवार, किरण गोंधळे, सिद्धाराम आयुक्त भीमनवार देवदर्शनासाठी पांढरे, प्रदीप बनसोडे, शीतलकुमार रवाना झाले. रविवारी सोलापूर कुंभार, राठोड उपस्थित होते.
कथित नागपूर येथील बदली प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहे. त्यांना नोटीसा परिवहन विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेचं होणार आहे.
- विवेक भीमनवार, राज्य परिवहन आयुक्त