महिला, विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षतेला प्राधान्य ; सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची ग्वाही

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. गुन्हेशोध पथकाच्या विशेष कामगिरी निमित्त  आयोजित  पत्रकार परिषदेत पवार यांनी ही  माहिती दिली.

    भिगवण: भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. गुन्हेशोध पथकाच्या विशेष कामगिरी निमित्त आयोजित  पत्रकार परिषदेत पवार यांनी ही  माहिती दिली.

    दिलीप पवार यांच्या या भूमिकेने आता भिगवण आणि परिसरातील रोडरोमिओ आणि धूमस्टाईल  रायडींग करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांवर कारवाई होणार आहे.   त्यामुळे अनेक  वर्षापासून प भिगवण आणि परिसरातील महिला आणि मुलींसाठी  या रोडरोमिओ आणि धूमस्टाईल बायकर्सचा त्रास होत होता. त्यातून त्यांची नक्कीच सुटका होणार आहे. तर महिला आणि मुलींसंदर्भातील  गुन्ह्यात आरोपींना  कठोरात कठोर कलमे लावण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या या संकल्पनेच पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.  तसेच  अशा गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची  नावे माध्यमातून प्रसिद्ध करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    -निर्भया पथक ठेवणार ‘वॉच’
    वेगाने दुचाकी चालविणे तसेच शाळा परिसरात विनाकारण  घिरट्या घालणाऱ्या रोडरोमियोंविरोधात कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकामार्फत  महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला जाणार  असल्याचे दिलीप पवार यांनी यावेळी सांगितले.