“साहेब मी गद्दार नाही…”, “राऊत बंधुंची ‘सामना’च्या फ्रंट पेजवरील जाहिरातीने शिंदे गटाला डिवचले; जाहिरातीत म्हटलंय…

'सामना'च्या आजच्या अंकात पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत “साहेब मी गद्दार नाही…” असा मजकूर ठळक अक्षरात छापण्यात आला आहे. मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

  मुंबई- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट (Shinde Vs Thackeray) अनेकवेळा आमनेसामने आला आहे. एकिकडे पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह या दोन्हीसाठी यांची न्यायालयीन (court) लढाई सुरु आहे. तर दुसरीकेड अधूनमधून हे दोन्ही गट कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन ऐकमेकांत भिडले जाताहेत. दरम्यान, आता वेगळ्या कारणावरुन ठाकरे गटाने शिंदे गटाला (Shinde Group) डिवचले आहे. सोमवारी म्हणजे उद्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.

  यानिमित्ताने ठाकरे गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. याची चुणूक शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रविवारच्या अंकात पाहायला मिळाली. ‘सामना’च्या आजच्या अंकात पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत “साहेब मी गद्दार नाही…” असा मजकूर ठळक अक्षरात छापण्यात आला आहे. मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

  काय म्हटलंय जाहिरातीत?

  साहेब मी गद्दार नाही!गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र…, असा मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते या टीकेला प्रत्युत्तर देताना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

  शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न…

  राऊत बंधूनी दिलेल्या या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देण्यात आला आहे. संजय राऊत किंवा सुनील राऊत यांचा फोटो देण्यात आलेला नाही. शिवाय जाहिरातीत सर्वात वर शिवसेनचं मशाल चिन्ह छापण्यात आलं आहे. त्याच्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव देण्यात आलं आहे. राऊत बंधुंनी या जाहिरातीतून शिंदे गटाला डिवचले आहे. या जाहिरातीत शिंदे गटाला झोंबणारा गद्दार हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आता त्यावर कसा पलटवार करतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.