बापरे! साईचरणी वर्षभरात जमले “एवढ्या कोटींचे दान”, रोज सरासरी एक कोटीपेक्षा अधिक देणगी; वार्षिक आकडा ऐकून थक्क व्हाल…

यंदा 1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकूण जवळपास 394 कोटी 29 लाख देणगी मिळाली आहे, अशी साई संस्थानकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या देणगीतून अनेक सामाजिक कार्य तसेच भाविकांसाठी मदत संस्थाकडून केले जात आहे.

    शिर्डी : देशातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थाने असलेले शिर्डीतील साईबाब मंदिरात भक्त देणगीच्या स्वरुपाच लाखो, करोडो रुपयांची मदत करत असल्याचं आपण ऐकत असतो. या वर्षी म्हणजे 2022 या वर्षीत साईचरणी विक्रमी देणगींची नोंद झाली आहे. यंदा 1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकूण जवळपास 394 कोटी 29 लाख देणगी मिळाली आहे, अशी साई संस्थानकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या देणगीतून अनेक सामाजिक कार्य तसेच भाविकांसाठी मदत संस्थाकडून केले जात आहे. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंतच्या (Saicharani Donates 400 Crores in a Year ) देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. साईसंस्थानचे विदेशी चलन खात्याचा परवाना रिन्युएशन करणे प्रलंबीत असल्याने कोट्यावधी रुपयांचे विदेशी चलन पडून आहे.

    वर्षाला मोफत अन्नदान व दिड कोटी भाविकांकडून लाभ

    दरम्यान, दरवर्षी या माध्यमातुनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान करते मदत राहुल जाधव, सीईओ, साईसंस्थान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दिड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.

    असं आहे देणगीचं स्वरुप?

    26 डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या देणगीचा तपशील-दक्षिणा पेटी- 165 कोटी 55 लाख, देणगी कांऊटर- 72 कोटी 26 लाख 27, डेबीट व क्रेडीट कार्ड-40 कोटी 74 लाख, ऑनलाईन देणगी- 81 कोटी 79 लाख, चेक व डीडी- 18 कोटी, 65 लाख व मनीऑर्डर- 1 कोटी 88 लाख रुपये. याशिवाय सोने- 25 किलो 578 ग्रॅम (11 कोटी 87 लाख), चांदी- 326 किलो 38 ग्रॅम(1 कोटी 51 लाख)