हिंगोलीत किराणा दुकानात देशी दारूची विक्री

हिंगोली कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एका किराणा दुकानावर आखाडा बाळापूर पोलिसांनी छापा टाकून देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका जणाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे(Sale of local liquor in Hingoli grocery store).

    हिंगोली : हिंगोली कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एका किराणा दुकानावर आखाडा बाळापूर पोलिसांनी छापा टाकून देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका जणाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे(Sale of local liquor in Hingoli grocery store).

    पोलिसांच्या या कामगिरीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपध्दतीवर शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एका किराणा दुकानातून देशीदारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी किराणा दुकानावर अचानक छापा टाकला.

    दुकानाच्या तपासणीमध्ये देशीदारूच्या सुमारे वीस बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून या प्रकरणी दुकानदार दयानंद हनवते याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.