Saleksa police arrest accused in kidnapping of minor girl

११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या दरम्यान आमगाव तालुक्यातील कुंभारटोलीतील ( kumbharitola ) एका अल्पवयीन मुलीचे  ( Minor Girl) अपहरण (kidnapping ) करण्यात आले होते. या प्रकरणी  १३ फेब्रुवारी रोजी आमगाव पोलीस ठाण्यात (Amagao police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आमगाव पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

    गोंदिया : आमगाव (Amagao) तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे (Minor Girl) अपहरण केल्याप्रकरणी पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला सालेकसा पोलिसांनी ( Salekasa Police) २० जून रोजी अटक केली आहे. दिलीप कांबळे असे आरोपीचे नाव असून तो सालेकसा तालुक्यातील पांढरी येथील रहिवासी आहे. अपहरण प्रकरणातील फरार आरोपी संदर्भात सोमवारी सालेकसा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी हा त्याच्या गावी पांढरी येथे आला आहे. त्यावर पोलिसांनी तातडीने गावात पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.

    ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या दरम्यान आमगाव तालुक्यातील कुंभारटोलीतील ( kumbharitola ) एका अल्पवयीन मुलीचे  ( Minor Girl) अपहरण (kidnapping ) करण्यात आले होते. या प्रकरणी  १३ फेब्रुवारी रोजी आमगाव पोलीस ठाण्यात (Amagao police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आमगाव पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. सोमवारी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई ठाणेदार हेगडकर, पोलीस  उपनिरीक्षक शिंदे, मुंडे, पोलीस शिपाई के.एम. मानकर, पगरवार, आरती होगी, इंगळे, माहुले यांनी केली. आरोपीला आमगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.