kalyan pipe theft

सध्या एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरळित करण्याकरीता पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. काटई नाका परिसरात पाईपलाईन टाकण्याकरीता 11 मोठ्या आकाराचे पाईप डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल परिसरात ठेवण्यात आले होते. 

    अमजद खान कल्याण: तुम्ही चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. चोरीच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी पाईपची चोरी झाल्याचं ऐकलं आहे का ? तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही पण कल्याणमध्ये अशी चोरी झाली आहे. पाण्याची पाईप लाईन टाकण्याकरीता एमआयडीसीकडून (MIDC) रस्त्याच्या बाजूला पाईप ठेवण्यात आले होते. काम सुरु करण्यात येणार होते. त्या आधीच 11 पाईप चोरीला गेले आहेत. पाईपचा (Pipe Theft) पुरवठादाराच्या सर्तकतेमुळे पाईप चोर सेल्समनला मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) अटक (Arrest) केली आहे. परशूराम संपाल असे या चोरट्याचे नाव आहे. तो उल्हासनगरचा राहणारा आहे.

    कल्याण (Kalyan) ग्रामीणच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे. या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरीता प्रयत्न केले जातात. मात्र नागरिकांचा कायम आरोप असतो की, पाणी पुरवठा नियमित केला जात नाही. सध्या एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरळित करण्याकरीता पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. काटई नाका परिसरात पाईपलाईन टाकण्याकरीता 11 मोठ्या आकाराचे पाईप डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल परिसरात ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारीच्या रात्रीस हे पाईप चोरीस गेले. चोरीबाबत कळल्यानंतर एमआयडीसीचे अधिकारी हैराण होते. पाईप नक्की गेले कुठे ? असा प्रश्न त्यांना सतावत होता. दुसरीकडे हे सगळे होत असताना उल्हासनगरातील एका मोठया कंपनीने त्यांच्या कामानिमित्त एका पाईप लाईन पुरवठा करणाऱ्या पुरवठादार कंपनीला पाईप लाईन खरेदीची ऑर्डर दिली होती. त्याचाच फायदा पाईपलाईन पुरवठा करणाऱ्या सेल्समनने घेतला. सेल्समनने पाईप लाईन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे तयार पाईप उल्हासनगरच्या खाजगी कंपनीला देण्याऐवजी एमआयडीसीचे पाईप चोरी करुन त्या कंपनीला पुरविले. मात्र त्या कंपनीला ज्या पाईपची गरज होती. ते पाईप हे नसल्याने ही माहिती पाईप लाईन पुरवठा करणाऱ्या कंपनीला देण्यात आली.याबाबत तपास करण्यात आला तेव्हा सेल्समन परशूराम संपाल याची चोरी पकडली गेली. शॉर्टकटमध्ये जास्त पैसे कमाविण्याचा उद्योग संपालच्या अंगाशी आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.